अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर शहर व उपनगरात चोर्या, घरफोड्या करणार्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
गणेश दिवाणजी काळे (वय 25 रा. वाकोटी फाटा ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वरील सराईत आरोपी काळे विरोधात भिंगार, तोफखाना पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
26 मे रोजी वाकोडी फाटा येथील रणजितसिंग छोटेलाल यादव (वय 54) यांच्या उघड्या असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरले होते. यादव यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरचा गुन्हा गणेश काळे याने केल्याची खबर एलसीबीला मिळाली.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काळे याला वाकोडी फाटा येथे अटक केली. पुढील तपासकामी त्याला भिंगार कॅम्प पोलिसांकडे देण्यात आले आहे.