अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- साईसंस्थानचे संभाव्य नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
साईसंस्थान व ग्रामस्थ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व त्यांचे सहकारी संजय शिंदे व राहुल गोंदकर, विश्वस्तपदाचा अनुभव तसेच साईमंदिरातील दर्शनव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारे
डाॅ. एकनाथ गोंदकर त्यांचे सहकारी सचिन चौगुले व अन्य मंडळी काँग्रेसपक्षाकडून इच्छुक आहेत. आजवर ज्या ज्या वेळी स्थानिक कार्यक्षम विश्वस्तांना संधी मिळाली, त्या त्या वेळी कटुता टाळण्यास मोठी मदत झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संस्थान व बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका आजही आहे. तसेच ज्या ज्या वेळी स्थानिकांना डावलून केवळ राजकीय सोय म्हणून विश्वस्तपदी वर्णी लावण्याचे प्रयत्न झाले,
त्या त्या वेळी ग्रामस्थ व मंडळात संघर्षाचे प्रसंग उभे राहीले. नियुक्तीनंतर पुन्हा न फिरणारे विश्वस्त पहायला मिळाले. बैठकांना दांड्या मारणाऱ्यांना पद गमावण्याची वेळ आली, हा इतिहास आहे.
हे टाळण्यासाठी स्थानिक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरते आहे.