करोनाचा उगम झालेल्या वुहानमध्ये पुन्हा लॉकडाऊन

corona news: चीनमध्ये सलग तीन दिवसांपासून १ हजारहून अधिक करोनाचे रुग्ण सापडले आहेत. जेथे करोनाचा उगम झाला त्या वुहान शहरापासून उत्तर पश्चिमेकडील अनेक शहरात करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

वुहानमध्ये पहिला रुग्ण सापडला होता. २०१९मध्ये तिथे सगळ्यात पहिले लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. आता दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा वुहानमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या परिसरातील इमारती सील करण्यात आल्या आहेत. या आठवड्यात वुहानमध्ये २० ते २५ नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या १४ दिवसांत वुहानमध्ये करोनाचे २४० रुग्ण सापडले आहेत.

स्थानिक प्रशासनाने एका जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक लोकांना ३० ऑक्टोबरपर्यंत घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोनाचा उगम हा चीनमधील वुहानमध्ये झाला होता.