अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच दिसून येत आहे. यातच राहता तालुक्यात कठोर नियम करण्यात आले असतानाच आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
यातच करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेवून नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीने पाच दिवसांचे लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गावातील बाजार देखील बंद करण्यात आला आहे. भाजीपाला विक्रेते यांनी नियम पालन करून दारोदार विकण्याचे आदेश देण्यात आले आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.
बेलपिंपळगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत गावात करोना परिस्थिती लक्षात घेता गावात पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याकाळात गावातील नागरिकांनी आपली जबाबदारी घेऊन काळजी घ्यावी.
घरीच राहा सुरक्षित राहा असे सांगण्यात आले आहे. गावातील किराणा दुकान यांना सकाळी दोन तास व रात्री एक तास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत ने सांगितले आहे.