लाॅकडाऊनचा निर्णय अन्यायकारक : दिवसातील काही तास बाजारपेठेतील दुकाने उघडी ठेवण्यास मंजुरी द्या…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- शासनाने सोमवार ५ एप्रिलला सायंकाळी घोषित केलेल्या लॉकडाऊन मध्ये संपूर्ण बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्याच्या दिलेला आदेश हा व्यापाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे.

बाजारपेठेचे कंबरडे मोडणारा आहे. दिवसभर दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा व दिवसातील काही तास बाजारपेठेतील दुकाने उघडी ठेवण्यास मंजुरी द्यावी,

अशी मागणी भारतीय सुवर्णकार समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सराफ सुवर्णकार व्यापारी संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ५ एप्रिल रोजी सायंकाळी संपूर्ण महाराष्ट्रात लॉक डाऊन संदर्भात एक आदेश शासनाने दिला आहे.

त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा, दुकाने, ३० एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद राहतील असा आदेश आपण दिला आहे. अचानक पणे असा आदेश देताना आपण महाराष्ट्रातील कुठल्याही व्यापारी प्रतिनिधीशी किंवा व्यापारी संघटनेशी चर्चा न करता अचानक आदेश दिला आहे.

अचानकपणे लादलेला हा निर्णय अन्यायकारक असून या प्रकारामुळे राज्यातील सर्व व्यापारी बांधव अडचणीत सापडले आहेत.

आधीच करोनामुळे बाजारपेठेचे कंबरडे मोडले आहे. त्यात अचानकपणे उद्भवलेल्या या गोष्टीमुळे संपूर्ण व्यापार व पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा अडचणीत येणार आहे.

ग्राहकांच्या ऑर्डरची डिलिव्हरी करणे, दुकानातील कामगार व कारागीर यांचे पगार देणे, तसेच बँकांचा कर्ज हप्ता भरणा यासाठी कुठलाही वेळ आपण व्यापारी वर्गाला दिलेला नाही.

दुकाने बंद राहिली तर हे कामे करणे शक्य नाही. कामगारांना वेळेत पगार झाला नाहीतर या सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. याचा विचार करून व्यापाऱ्यांना दिवसातील काही तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24