‘या’तालुक्यातील ४३ गावात १० ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन…!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   वेगाने होणारा कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी पारनेर तालुक्यातील ४३ गावांमध्ये ११ दिवस संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत वैद्यकीय व कृषी संबंधित सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

टाळेबंदी लागू करण्यात आलेल्या गावांमध्ये पारनेर शहरासह, सुपे, भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, निघोज, जवळे, वडझिरे, देवीभोयरे, रांजणगाव मशीद या प्रमुख गावांसह ४३ गावांचा समावेश आहे. इतर गावांमध्ये तसेच तालुक्याबाहेर मोलमजुरीसाठी जाणाऱ्या मजुरांची नियमित आरोग्य तपासणी करणे.

भाजीपाला, फळे, दूध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह गावातून इतरत्र वाहने घेऊन जाणाऱ्या चालकांना विविध गावात आल्यानंतर विलगीकरणात ठेवण्यात यावे.

त्यासाठी शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावेत . विवाह समारंभ, वाढदिवस, उद्घाटने, राजकीय कार्यक्रम, दशक्रिया विधी अश्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा समारंभासाठी नियमापेक्षा जास्त उपस्थिती असल्यास तसेच कोविड सुसंगत उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. नियमांचेउल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करून संबंधित कार्यालये संसर्ग संपेपर्यंत कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.

अहमदनगर लाईव्ह 24