अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात आज पासून ४ एप्रील दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू जाहीर करण्यात आला आहे. तसेच दर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार आहे. असे असले तरी देखील राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरूच राहणार आहेत.
अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशंत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊच्या कार्यकाळात प्रत्येक नागरिकांनी स्वत:हून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे कोटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच हा संसर्ग आटोक्यात येईल. जिल्ह्याभरात ११ मार्च ते ४ एप्रील पर्यत अशंत: लॉकडाऊन आहे.
या लॉकडाऊन दरम्यान एसटीची सेवा सुरूच राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या पूर्वीच एसटीच्या अधिकाऱ्यांसह चालक वाहक आणि प्रवाशांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र प्रत्येक प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या शिवाय शासनाने घालुन दिलेल्या नियम आणि अटीचे सुध्दा पालन करावे असे आवाहन एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.