अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-कोरोना साथरोगाचा वाढता प्रकोप लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन करण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र, लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे म्हंटले आहे. राज्यात करोनाची दुसरी लाट आली असून गंभीर रूप धारण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली असताना
आता सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला जाहीरपणे विरोध दर्शवण्यात आला आहे.
आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असून आधीच जनता लाकडाऊनला कंटाळली असताना लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही.
राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, असे पटेल यांनी सांगितले.
लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
लॉकडाऊनला आतापासूनच विरोध केला. जाऊ लागला असून हा विषय नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.