लॉकडाउनने मारले अन शेतीने तारले!! लॉकडाउन मध्ये घरी परतलेल्या शेतकरी दांपत्याने शेती करत विकासाचा मार्ग चोखाळला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2022 Formal success story :- मित्रांनो 2020 मध्ये कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आले होते.

लॉकडाउन लावला त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शासनाला शक्य झाले, मात्र या लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खुपच बिघडली.

यामुळे देशातील लाखो लोकांचे विशेषत: मजुरांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले. कोरोना लोकांसाठी यमदूत ठरत होता अनेक लोक मृत्युमुखी पडत होते.

तर काही लोकांचे रोजगार देखील या काळात गेले होते. एकीकडे कोरोना अनेकांच्या उदरनिर्वाहाचा काळ बनत होता तर दुसरीकडे हाच कोरोना झारखंडमधील (Jharkhand) एका जोडप्यासाठी वरदान ठरला आहे.

झारखंडच्या रावतारा गावात राहणारा 37 वर्षीय सूर्या मंडी हा शेतकरी (Farmer) लॉकडाऊनमध्ये घरी परतला होता, मात्र या दरम्यान, त्याच्याकडे हाताला काम नसल्यामुळे स्वतःचा आणि घराचा खर्च भागवणे कठीण होत होते.

दरम्यान, त्यांनी आपली वडिलोपार्जित शेती करण्याचे ठरवले. सूर्या मुंडी यांनी त्यांच्या पत्नी रुपाली यांच्यासोबत मिश्र शेती करून संपूर्ण गावात एक वेगळा आदर्श निर्माण केला.

आजच्या काळात हे शेतकरी कुटुंब आपल्या गावातील लोकांसाठी प्रेरणास्थान बनत आहे. एवढेच नाही तर हे शेतकरी कुटुंब मिश्र शेती करून दरमहा लाखो रुपये देखील कमवत आहे. शेतकरी सूर्या मंडी सांगतात की, पूर्वी ते त्यांच्या शेतात फक्त भाताचीच लागवड करायचे, पण लॉकडाऊनच्या काळात त्यांनी भातासोबत अनेक भाज्यांची मिश्र शेती केली, या शेतीतुन त्यांना खूप चांगला नफा मिळाला.

हे शेतकरी कुटुंब सुमारे 2 वर्षांपासून मिश्र शेती करत आहे. मुंडी पुढे म्हणतात की, एकीकडे भातशेती करून ते त्यांच्या कुटुंबासाठी अन्नधान्याची योग्य व्यवस्था करतात आणि दुसरीकडे विविध भाज्यांची लागवड करून दुप्पट नफा देखील शेतीतुन कमवत आहेत.

या शेतकरी दाम्पत्याचा यशाने प्रभावित होऊन आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक शेतकरी बांधव मिश्र शेती कडे वळू लागले आहेत.

एवढेच नाही तर ज्या लोकांची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली तो मजूरवर्ग देखील या शेतकरी दाम्पत्याच्या प्रेरणेने, आपल्या गावात मिश्र शेती करून दुप्पट नफा लागला आहे. एकंदरीत सूर्या यांनी शेतीमध्ये केलेल्या बदलाचा त्यांना व इतर शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.