कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचे : राजेंद्र भोसले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी नगरकडे जात असताना करंजी गावाला धावती भेट दिली.

यावेळी शिवसेना नेते रफिक शेख, सरपंच बाळासाहेब आकोलकर, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, डॉ. भगवान दराडे आदी उपस्थित होते.

यावेळी करंजी गावातील कोरोना पेशंटबाबत रफिक शेख यांनी िल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पेशंटबाबत आढावा घेत साखळी तोडण्यासाठी चार दिवसाचे नव्हे, तर किमान पंधरा दिवसाचे लॉकडाउन असावे, अशा सूचना केल्या.

करंजी गावाला गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्यसेविका नाही. याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी पुढील महिन्यात करंजी गावाला आरोग्य सेविकेची नेमणूक केली जाईल, असे सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24