अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- मागील वर्षी लॉकडाउनच्या पूर्वी शेतकऱ्यांना ३४ ते ३५ रुपये दुधाला प्रति लिटर भाव मिळत होता. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले.
त्यामध्ये १७ रुपये लिटर पर्यंत भाव खाली आले. त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनेक मोर्चे आंदोलन केले व जमावबंदीचे गुन्हे अंगावर घेतले, आता कुठं तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात ३२ ते ३४ रुपये प्रति लिटर दराने पैसे हातात मिळत असताना.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर लगेच दूध प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत असून, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
एकीकडे उन्हाळ्यामध्ये चारा, सरकी पेंड, पेट्रोल, डिझेल महाग झालेले असून दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध शासनाने हमीभावाने खरेदी करावे
किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति लिटर दहा रुपये अनुदान जमा करावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.