लॉकडाऊनच्या निर्बंधाची कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्रामआरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून लॉकडाऊनच्या निर्बंधाची कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी,असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले .

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी कोरोना रुग्णांशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांना धीर दिला.तालुक्यातील चंदनापुरी ,आंबी दुमाला, बोटा येथे कोविड केअर सेंटरची पाहणी व नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे ,जि.प. सदस्य अजय फटांगरे ,मिलिंद कानवडे,आर. बी. रहाणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर, सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके ,प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम,

गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. प्रत्येक गावात युवकांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम करावी यासाठी अनुशासित समित्या तयार करा. ग्रामीण भागात वाढणारी कोरोणाची रुग्ण संख्या ही चिंताजनक असून

येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही वाढ पूर्ण थांबवायची आहे. यासाठी प्रत्येकाने जागृतीने काम करा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आ. डॉ. तांबे म्हणाले, कोरोनाची काळजी हाच कोरोना वरचा उपाय आहे.

येत्या काळात सर्वांचे लसीकरण होण्यासाठी नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असून गर्दी व घरगुती समारंभ टाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोणतेही लक्षण आढळल्यास तर तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिर्का­यांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24