राज्यात पुन्हा होणार लॉकडाऊन, जाणून घ्या काय सुरू काय बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे समोर येत आहे.

त्याचबरोबर राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत.

आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9 हजार 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

तर 8 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 30 हजार 527 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय सुरू काय बंद ?

  • कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत.
  • खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत.
  • अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने.
  • लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणे आवश्यक
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी. सर्व
  • धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी.
अहमदनगर लाईव्ह 24