अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनतेने अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे अनेक नागरिक शक्य तितक्या लवकर जाऊन लसीकरण करुन घेत आहे.
त्यामुळेच लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांकडून पहाटपासून गर्दी केल्याचे दिसून येऊ लागले आहे. करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक पहाटे 4 वाजेपासून राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी करतात.
लसीचा पुरवठा कमी असल्याने दररोज लस घेण्याकरिता जवळपास तिनशे नागरीक पहाटे चार वाजेपासून राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात टोकन मिळण्यासाठी रांगेत अनेक तास उभे राहत असल्याचे चित्र आहे.
परंतु जितका साठा उपलब्ध आहे तेवढेच टोकन प्रथम रांगेत येणार्या नागरिकांना दिले जाते. परिणामी ज्यांना टोकन मिळाली नाही त्यांना पुन्हा दुसर्या दिवशी लसीकरणासाठी पहाटेच रांगेत घेऊन उभे राहुल टोकन मिळेल की नाही याची प्रतीक्षा करावी लागते.
लसीचा पुरवठा कमी असल्याने अनेक लस लाभार्थ्यांना दुसरा डोस शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दिवस होऊनही मिळत नाही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना संपूर्ण दिवस काम करून दररोज पहाटे रुग्णालयात घेऊन लसीकरणासाठी होणार्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
केवळ आपल्याला लस मिळावी म्हणून तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही दिवस रात्र करून लसीकरण केंद्राबाहेर बसत आहेत. त्यातच नागरिक जास्त येत असल्याने टोकनही कमी पडू लागले आहेत.
रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना टोकन मिळत आहेत मात्र सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरीकांना पुन्हा घरी जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत.