अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अंतर्गत लोणी ग्रामपंचायतीने यश करुन माझी वसुंधरा पुरस्कार पटकावला आहे.
जागतीक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्तें ऑनलाईन कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. राज्याच्या पर्यावरण व वातावणीय विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये भुमी,
जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत पाच गटात स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ऑनलाईन पध्दतीने पार पडला. या समारंभास महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,
ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री ना.अदित्य ठाकरे, राज्यमंत्री ना.संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते. लोणी बुद्रुक, ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील,
माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे. या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, सरपंच सौ.कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे,
रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, भाऊसाहेब विखे, प्रविण विखे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयुर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी सौ.कविता आहेर आदि उपस्थित होते.