Maharashtra : “शिंदे गटातील नेत्यांची परिस्थिती पाहता तीन तिघाडा आणि काम बिघाडा…”

Maharashtra : राज्यात काही दिवसांपूर्वी सत्तांतराच्या राजकीय घडामोडी घडल्या आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. शिवसेनेतील काही आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार टीकास्त्र सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांचा प्रवेश सुरूच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहेत. आता नाशिकमधील ठाकरे गटाचे १२ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटावर आणि गटात प्रवेश करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी चिमटे काढले आहेत.

सुधाकर बडगुजर म्हणाले, संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे वावड्या उठवत आहे. शिंदे गटात ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा प्रवेश म्हणजे फुसका बार असल्याचे ते म्हणाले आहेत.

पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण करण्याचे काम होत असले तरी कुणीही शिंदे गटात प्रवेश करणार नाही असेही सुधाकर बडगुजर म्हंटले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिंदे गटात नाशिकमध्ये फार मोठे प्रवेश झालेले नाहीत. एक खासदार आणि दोन आमदार वगळता कुठलाही मोठा चेहरा शिंदे गटात गेलेला नाही.

त्यातच शिंदे गटात तिन्ही महत्वाच्या नेत्यांची परिस्थिती पाहता तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी झाल्याची चर्चा नाशिकमध्ये बघायला मिळत आहे.

नाशिकमधील शिंदे गटाकडून अनेकदा ठाकरे गटातील नगरसेवक, पदाधिकारी फुटणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.

यावरच ठाकरे गटाकडून शिंदे गटाला चिमटे काढण्यात आले आहे. शिंदे गटात प्रवेश म्हणजे फक्त फुसका बार असल्याचे म्हंटले आहे, याशिवाय शिंदे गटात खासदार गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही असेही ते म्हणाले.