Moto S30 Pro Pantone Edition : खिशाला परवडणारा स्मार्टफोन खरेदी करायचाय? मोटोरोला लाँच करणार स्वस्त स्मार्टफोन

Moto S30 Pro Pantone Edition : स्मार्टफोन हा सध्या एक जीवनावश्यक भाग बनला आहे. जबरदस्त फीचर्समुळे सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप महाग झाल्या आहेत. तरीही तुम्ही आता स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

होय, लवकरच Motorola आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन तुमच्या खिशाला परवडेल. परंतु, तुम्हाला या फोनची काही वेळ वाट पहावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Motorola ने त्याचे Moto S30 Pro Pantone एडिशन लॉन्च केले असून ते अतरंगी रंगात येते. जाणून घेऊया या धमाकेदार स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने S30 Pro Pantone ची Moto Edge 30 Fusion ची विशेष आवृत्ती म्हणून सादर केली असून यामध्ये 6.55-इंचाचा वक्र OLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन 144Hz च्या रिफ्रेश रेटसह आणि फुल HD+ च्या रिझोल्यूशनसह आहे. तर या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 Plus चिपसेट प्रोसेसर कंपनीने दिला आहे.

बॅटरी

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 4,270mAh बॅटरी असून ती 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कंपनीने यामध्ये स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर फीचर दिले आहे.

कॅमेरा

या नवीन स्मार्टफोनमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी तीन कॅमेरा सेटअप दिले आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल OmniVision OV50A आहे. तर, इतर दोन कॅमेरे 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड युनिट आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतात. फोनच्या पुढच्या बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेराही दिला आहे.

किंमत

Moto चा हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे.स्टोरेजचा विचार केला तर त्याचा 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंट सादर केला आहे. चीनमध्ये त्याची किंमत 2,699 युआन म्हणजेच 31,991 रुपये इतकी आहे. भारतात हा फोन 05 जानेवारी 2023 ला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.