अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-अभिनेता राहूल व्होरा याचे कोरोनामुळे निधन झालं आहे. दिग्दर्शक अरविंद गौड यांनी सोशल मीडियावरून राहुलच्या निधनाची बातमी दिली होती.
निधनाच्या एक दिवस आधी, पुन्हा जन्म घेऊन चांगलं काम करेन, आता हिंमत हारलो आहे अशा आशयाची पोस्ट राहुलने फेसबुकवर शनीवारी लिहीली होती. दुसऱ्याच दिवशी तो आयुष्याशी झुंज हारला. राहूल हा मुळचा उत्तराखंडचा होता.
थिएटरमध्ये काम करण्याबरोबर तो डिजिटल प्लॅटफॉर्मवरही काम करत होता. त्याने अनेक वेब सीरीजमध्येही काम केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. ‘मलाही उपचार मिळाले असते,
तर मीही वाचलो असतो’ असं लिहून राहुलने फेसबुकवर स्वतःचे डिटेल्स शेअर केले होते. ‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असं राहुलने फेसबुकवर लिहिलं होतं. “मला कोव्हिड संसर्ग होऊन चार दिवस झालेत, मी रुग्णालयात दाखल आहे, पण रिकव्हरी झालेली नाही.
ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे. कुठे ऑक्सिजन बेड मिळेल का?” अशी पोस्टही त्याने ४ मे रोजी केली होती. मलाही उपचार मिळाले असते, तर मीही वाचलो असतो’ असं लिहून राहुलने फेसबुकवर स्वतःचे डिटेल्स शेअर केले होते.
‘पुन्हा लवकरच जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता हिंमत हरलोय’ असं राहुलने फेसबुकवर लिहिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना त्याने टॅगही केलं होतं.