अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- या सरकारकडून निधी देतांना अतिशय वेगळी वागणूक आपल्याला दिली जाते. ज्या ठिकाणी भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना एक कोटी तर त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी आहेत त्यांना पाच ते सहा कोटी दिले जातात.

जामखेड,कर्जत, पारनेर, नेवासे, अकोला, संगमनेर यांच्यासाठी पाच ते आठ कोटी तर शेवगाव – पाथर्डी, राहता व श्रीगोंदा या तालुक्यासाठी फक्त एक कोटी निधी दिला जातो. त्यामुळे तालुक्यातील २०० गावांना निधी देतांना अडचणी येत आहेत.

अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. शेवगाव तालुक्यातील एका रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे आमदार राजळे म्हणाल्या की, महाविकासआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर ४० हजार किमीचे रस्ते वर्षाला करु अशी घोषणा पहिल्याच अधिवेशनात केली. मात्र त्यांची ही घोषणा हवेतच विरली. अजून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा सर्व्हे किंवा प्लँनिंग केलेले नाही.

त्यासाठी निधीही उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे आपल्या तालुक्यात अनेक रस्ते प्रलंबीत आहेत. जे रस्ते आपल्याला करता येतील ते डीपीडीसी व २५/१५ तून करत आहोत. शासकीय कार्यालयातील सर्व समितीत्या पेंडींग असल्याने गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.

आपल्या घरात, शेजारील कुटूंबात कोरोना पोहचला असून, हे संकट गेलेले नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24