अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-संगमनेर तालुक्यातील घारगाव मधील एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असताना एका व्यक्तीने मयत कुटुंबियांच्याकडून कर्ज वसुलीसाठी मालमोटार ओढून घेऊन गेला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेरातील येठेवाडी परिसरातील बजरंग आगिवले या तरुणाचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला.
या कुटुंबियांकडे एक मालमोटार आहे. ती मालमोटार कोल्हापूर येथे माल घेऊन गेली असता घारगाव येथील एका इसमाने ही मालमोटार तेथून बळजबरीने ताब्यात घेतली.
आगिवले यांना मी कर्ज दिलेले आहे. मला ते वसूल करायचे आहे, असा पवित्रा या इसमाने घेतला आहे. आगिवले कुटुंबीयांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संबंधित वसुलीदार पोलिसांसमवेत ठाण्यात बसला होता.
पीडितेची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसानी पिडीतेलाचा खडेबोल सुनावले. काही नागरिकांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त व्यक्त केला आहे.
अन्याय झाला तर न्यायासाठी खाकी घालणारेच जर अशा गुंडाना साथ देणार असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल केला जात आहे.