Alert : सध्याच्या काळात एटीएम कार्ड खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण यामुळे पैसे काढणे सोयीस्कर झाले आहे. त्यासाठी ते नीट वापरले आणि जपून ठेवले पाहिजे.
अनेकदा आपण एटीएम कुठे तरी ठेवतो आणि नंतर ते विसरुन जातो.तसेच अनेकदा एटीएम कार्ड हरवते. जर तुमचेही एटीएम कार्ड हरवले असेल तर लगेच वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.
त्वरित करा हे काम
कार्ड ब्लॉक करा
जर तुमचे डेबिट-क्रेडिट कार्ड चोरीला गेले तर तुमचे कार्ड लगेच ब्लॉक करा. तुम्ही कस्टमर केअरला कॉल करून तसेच एटीएम कार्डच्या मागील नंबरवर किंवा तुमच्या नेट बँकिंगद्वारेही तुम्ही तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता.
बँकेला कळवा
तसेच तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चोरीला गेले की बँकेला नक्की कळवा. कारण जर तुम्ही बँकेला याबाबत सांगितले नाही तर तुम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. बँकेला याबाबत सांगितले की बँक तुम्हाला मदत करते.
त्वरित पासवर्ड बदला
नेट बँकिंग, UPI आणि इतर बँकिंग पासवर्ड बदलायला पाहिजे. कारण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचे आहे.
नवीन कार्ड घ्या
डेबिट-क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यामुळे पुन्हा ते वापरता येत नाही. त्यामुळे तुम्हाला ते नवीन डेबिट-क्रेडिट कार्ड बनवावे लागेल.