जगताप आणि नागवडे यांना बिनविरोध संचालक होण्याची लाॅटरी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:- जिल्हा बँक निवडणूक श्रीगोदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राहुल जगताप, महिला प्रवर्गातून जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे यांना बिनविरोध संचालक होण्याची लाॅटरी लागली.

या निवडीनंतर श्रीगोंद्यात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. मात्र, बिगर शेती प्रवर्गातून माजी उपसभापती दत्तात्रय पानसरे हे विखे गटाकडून व थोरात गटाकडून पारनेरचे प्रशांत गायकवाड यांच्यात लढत होईल. माजी आमदार राहुल जगताप यांची बिननिवड व्हावी म्हणून माजी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक लावली.

राहुल जगताप यांचा बिनविरोध मार्ग मोकळा करण्यात आला. बिनविरोध जागांबाबत विखे व थोरात गटांत समझोता झाला. थोरात गटाकडून अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे करण्यात आल्याने विखे गटाच्या अर्चना पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अहमदनगर लाईव्ह 24