8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा लागणार लॉटरी, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट!

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आहे. देशभरात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

येत्या दोन वर्षात केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असून सर्व काही सुरळीत राहिल्यास पुढील वर्षी 2024 मध्ये 8व्या वेतन आयोगाचे नियोजन केले जाऊ शकते, अशी चर्चा पुन्हा एकदा सरकारी विभागांमध्ये जोर धरू लागली आहे. असे झाले तर त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होऊ शकते. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

Advertisement

किमान वेतन 26,000 रु

वृत्तानुसार, 8 व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी संघटनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढेल. आणि फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढेल.

2026 मध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होऊ शकतात

Advertisement

कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दर दहा वर्षांतून एकदाच लागू होतो. हाच प्रकार पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत दिसून आला आहे. एका अंदाजानुसार, 8 वा वेतन आयोग 2024 मध्ये स्थापन केला जाईल आणि ज्याच्या शिफारशी 2026 मध्ये लागू केल्या जाऊ शकतात.

वेतन आयोग रद्द होणार?

यासोबतच सातव्या वेतन आयोगानंतर त्याची परंपरा संपुष्टात येणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. म्हणजेच सातव्या वेतन आयोगानंतर नवा वेतन आयोग येणार नाही. त्याऐवजी सरकार स्वयंचलित वेतनवाढ प्रणाली लागू करू शकते.

Advertisement

यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ आपोआप होणार आहे. हे खाजगी नोकऱ्यांमधील वाढीसारखे असू शकते. यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त डीए असल्यास पगारात आपोआप रिव्हिजन होईल.