प्रेम फिस्कटलं; तरुणाकडून तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- अश्लील फोटो (सोशल मीडिया) इंस्टाग्रामवर प्रसारीत करुन मुलीला आणि कुटुंबास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे.

रोहीत पाटोळे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित मुलीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, रोहीत जालिंदर पाटोळे याचे व माझे एकमेकावर प्रेम होते.

दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहीत पाटोळे याने त्याचे मोबाईल मध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते.

त्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची मागणी घालु लागला. त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देवू लागला.

तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्हीडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला आरोपी रोहीत पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहीत पाटोळे हा फरार झालेला होता. पोनि .अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी नाम रोहीत पाटोळेला पुण्यातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून गुन्हयात वापरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोस्टे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24