अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- तरूणीने लग्नाला नकार देताच तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह केलं होतं. तसेच हा तरूण २७ वर्षांचा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता.
परंतु तरूणीने लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले. परंतु तरूणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याअगोदर त्याने एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. यामध्ये त्याने सांगितलं की, मागील तीन वर्षांपासून तो एका तरूणीच्या प्रेमात होता.
तसेच त्याने तरूणीला आर्थिक मदत सुद्धा केली होती. प्राथमिक माहितीनुसार,या दोन्ही प्रियकरांमध्ये नेहमी भांडण होत असत, त्याचप्रमाणे मागील आठवड्यात त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं.
यामध्ये तरूणीने प्रियकराला जीव देण्यास सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रियकराने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची चाचपणी केली असून या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच पोलीस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.