LPG Gas Cylinder : देशात सतत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. अशातच तुम्हाला दिलासा देणारी एक बातमी आहे. तुम्ही वाढत्या महागाईतही कमी किमतीत गॅस सिलिंडर आणू शकता. परंतू यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. अशातच आता तुम्ही फक्त 500 रुपयांना गॅस सिलिंडर घरी आणू शकता. त्यामुळे नियम आणि अटी काय आहेत जाणून घेऊयात सविस्तरपणे.
तुम्ही आता अवघ्या 500 रुपयांना सिलिंडर खरेदी करू शकता, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. खरं तर सरकारची ही घोषणा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असणार.
या लोकांना मिळतोय 500 रुपयांना गॅस सिलिंडर
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही राजस्थान राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तेथील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
केवळ अशा लोकांनाच या सिलिंडरचा लाभ मिळणार आहे, ज्यांचे नाव बीपीएल आणि पीएम उज्ज्वला योजनेशी जोडण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने अनेक मानके तयार केली असून या निर्णयानंतर लोकांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत आहे, अशातच जर तुम्ही अशी सुवर्णसंधी हातातून जाऊ दिली तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.
होणार बचत
राजस्थान येथे लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची जय्यत तयारी सुरू आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गरिबांच्या मदतीसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा फायदा राज्यातील लाखो लोकांना होणार असल्याने याला राज्य सरकारने मंजुरीही दिली आहे. तुम्हाला खरेदीच्या वेळी पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे, परंतु काही दिवसांनंतर तुम्ही 500 रुपयांच्या वर पैसे देखील द्याल, जे सबसिडी म्हणून तुमच्या खात्यात जमा करण्यात येतील.