ताज्या बातम्या

LPG Rate : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा कमी झाल्या एलपीजी सिलेंडरच्या किमती, पहा नवीनतम दर

LPG Rate : वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. काही दिवसांपूर्वी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. अशातच पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर.

हे लक्षात ठेवा की एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतील कपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवर लागू केली आहे, तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही कपात केली नाही. जुलैमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर लोकांच्या बजेटवर परिणाम होईल.

जाणून घ्या 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत

दिल्ली येथे 19 किलोच्या सिलिंडरमध्ये 1976.50 रुपयांऐवजी 1885 रुपये असणार आहे. कोलकातामध्ये तो 2095.50 रुपयांना उपलब्ध असणार आहे. मुंबई येथे 1844 कमर्शियल सिलिंडर रु. गॅस सिलिंडर चेन्नईमध्ये 2045 रुपये किमतीत उपलब्ध असणार आहे.

सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही

मागील वर्षी ६ जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे एलपीजी सिलिंडर अजूनही त्याच किमतीत मिळत आहे. दिल्ली येथे एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रु. तर कोलकात्यात घरगुती सिलिंडर 1079 रुपये इतका आहे. मुंबई येथे तो 1052 ला मिळत होता. चेन्नई येथे रु.1068 मध्ये मिळत होता.

1 ऑगस्ट रोजी किंमत

गॅस कंपनीकडून दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरची किंमत ठरवण्यात येते. यापूर्वी ऑगस्टमध्येही एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यावेळी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी कमी झाली असून दिल्ली येथे 19 किलोच्या सिलेंडरची किंमत पूर्वी 2012.50 रुपये इतकी होती. या कपातीनंतर किंमत 1976.50 इतकी निश्चित केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts