अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- ब्रॅण्ड एमजीने लक्झरी ब्रॅण्ड कारच्या मालकांसोबत इतर ग्राहकांचे लक्ष झपाट्याने वेधून घेतले आहे. मर्सिडीज, व्होल्व्हो, जग्वार, रेंज रोव्हर इत्यादी सारख्या लक्झरी मार्कीजप्रती पसंतीमध्ये वाढ होत आहे.
मालक भारतातील पहिल्या इंटरनेट कनेक्टेड प्रिमिअम एसयूव्हीला परिभाषित करणा-या एमजीच्या विभागाकडे वळत आहेत. एमजी ब्रॅण्डवर विश्वास दाखवत ऑक्टोबर २०२० मध्ये हेक्टर प्लस डिझेल खरेदी केलेला एक ग्राहक आता ग्लॉस्टर ६ सेव्ही टॉप ट्रिममध्ये अद्ययावत होत आहे.
या परिवर्तनाने त्याला त्याच्या हेक्टर प्लससाठी ६ महिन्यांनंतर ९३.७ टक्के रिसेल किंमत दिली. त्याने १७ लाख रूपयांमध्ये त्याची हेक्टर प्लस एक्स्चेंज केली.
जग्वारच्या मालकाचे नुकतेच अजून एक उदाहरण आहे. ज्याने त्याच्या मालकीची लक्झरी एसयूव्ही एक्स्चेंज करत एमजी ग्लॉस्टर टॉप ट्रिम – सेव्ही खरेदी केली. यापूर्वी गेल्या वर्षी ग्राहकाने त्याच्या मालकीच्या रेंज रोव्हरच्या एक्स्चेंजमध्ये ‘एमजी हेक्टर’ खरेदी केली होती.
ग्लॉस्टर सेव्ही २.० ट्विन टर्बो :- स्थापित मानकांना पुनर्परिभाषित करण्यासंदर्भात ग्लॉस्टर सेव्ही भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रातील नवीन अध्याय आहे. शार्प २.० वैशिष्ट्ये असण्यासोबत या प्रिमिअम एसयूव्ही सेव्हीमध्ये अॅडवान्स ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टिम (एडीएएस)
किंवा लेव्हल १ ऑटोनॉमससह सुसज्ज आहे. तसेच फॉरवर्ड कोलिझन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट व अॅडप्टिव्ह क्रूझ कंट्रोल हे पॉवर-पॅक पॅकेज देखील एसयूव्हीमध्ये दिसू शकते. ब्रिटीश लेगसी कारउत्पादक कंपनीने आपल्या सेव्ही व्हेरिएण्टसह उत्साह वाढवला आहे आणि भारताला ऑटोनॉमस मोबिलिटीच्या दिशेने नेले आहे.
आय-स्मार्ट २.० :- एमजी ग्लॉस्टरच्या आय-स्मार्ट २.० मध्ये स्मार्ट, सेव्ही व शार्पसाठी ७० हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये आहेत, जसे क्रिटीकल टायर प्रेशर वॉईस अलर्ट, शॉर्टपेडिया अॅप, जे शॉर्ट न्यूज सारांश देते आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून अॅण्टी-थेफ्ट इमोबिलायझेशन, जे दूरूनच इंजिन इग्निशन थांबवते.
तसेच यामध्ये मॅपमायइंडियाचे ३डी मॅप्स आहेत, जे कोविड चाचणी केंद्रांबाबत, तसेच खड्डे व गतीवरील नियंत्रण यांसारख्या इतर अलर्टसबाबत देखील माहिती देतात. एमजी ग्राहक अॅप्पल वॉच कनेक्टीव्हीटीचा देखील आनंद घेतील आणि वॉईस कंट्रोलच्या माध्यमातून त्यांचे गाना अॅप ऑपरेट करू शकतील. तसेच यामध्ये पर्सनलाइज्ड वेलकम व ग्रीटिंग मॅसेजेस् देखील आहे.
ग्लॉस्टर ही देशाची पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रिमिअम एसयूव्ही भारतामध्ये सुपर, स्मार्ट, शार्प व सेव्ही या ४ वैशिष्ट्य-संपन्न व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या संदर्भात नवीन ग्लॉस्टरमध्ये ड्युअल फ्रण्ट, साइड व फुल-लेंथ कर्टन एअरबॅग्ज, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, रोल मूव्हमेंट इंटरवेन्शन,
हिल होल्ड कंट्रोल, हिट डिसेंट कंट्रोल व अॅण्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), ब्रेक असिस्ट व रिअर डिस्क ब्रेक्स अशी सुरक्षितताविषयक वैशिष्ट्ये आहेत.
सुपर ट्रिम ड्रायव्हर्सना अधिक प्रगत क्षमता देते, जसे ड्रायव्हर फॅटिग रिमांइडर सिस्टिम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेकसह ऑटोहोल्ड. तसेच या वेईकलमध्ये रिअरसोबत फ्रण्ट पार्किंग सेन्सर्स, फ्रण्ट व रिअर फॉग लॅम्प्स आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स,
हिटेड आऊटसाइड मिरर्स आणि रिअर विंडशील्ड डिफॉगर आहे. प्रमाणित डिझाइन घटक आहेत क्रोम-स्टडेड फ्रण्ट ग्रिल, एक्स्टीरिअर क्रोम डोअर हँडल्स आणि डेकोरेटिव्ह फेण्डर व मिरर गार्निश. चारही व्हेरिएण्ट्समध्ये ड्युअल बॅरेल ट्विन क्रोम एक्झॉस्ट व फ्रण्ट अॅण्ड रिअर मड फ्लॅप्स आहेत.
एलईडी हेडलॅम्प्ससह ऑटो लेव्हलिंग, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी टेल लॅम्प्स देखील सर्व एमजी ग्लॉस्टर्समध्ये आहेत. सुपर ट्रिमची इतर काही डिझाइन वैशिष्ट्ये आहेत,
डायमंड-कट मल्टीस्पोक अलॉई व्हील्स आणि ओआरव्हीएमवरील टर्न इंडिकेटर. ग्लॉस्टरमध्ये प्रमाणित इलेक्ट्रॉनिक गिअर शिफ्ट म्हणून ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह इंटेलिजण्ट स्टार्ट/स्टॉप आहे. प्रिमिअम एसयूव्ही साऊंड अॅब्जॉर्बिंग विंडस्क्रिनसह अद्वितीय गोपनीयता देखील देते.
सर्व ग्लॉस्टर व्हेरिएण्ट्समध्ये १२.३ इंच एचडी टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, यूएसबी, एफएम आहे. तसेच चारही व्हेरिएण्ट्समध्ये ब्ल्यूटूथ म्युझिक व कॉलिंग वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.