अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी हिंदकेसरी पै.संतोष वेताळ यांनी अडीच किलो चांदीची गदा बनविली होती.
परंतु कोरोना काळ चालू असल्याने शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना काळात आदर्श काम उभे केलेल्या आ. लंके यांना पवार यांच्यासाठी बनवलेली चांदीची गदा दिली आहे.
गुरुसाठी बनवलेली ही अडीच किलोची चांदीची गदा आमदार लंके या शिष्याला दिले असल्याचे हिंदकेसरी पै. वेताळ यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात आपल्या मतदारसंघातील जनतेला नव्हे तर जिल्ह्यातील जनतेला कोविड सेंटरच्या माध्यमातून दिलासा दिला असून, आमदार लंके यांच्यासारख्या आमदारांची प्रत्येक मतदारसंघाला गरज असल्याचे मत हिंदकेसरी पै.संतोष वेताळ यांनी व्यक्त केले.
हिंदकेसरी फाऊंडेशन सुर्ली (कराड) येथे आ. निलेश लंके यांना “कोरोना केसरी” किताबाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी वेताळ बोलत होते. आ. लंके यांना अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.