माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या आरोग्यासाठी साईपुष्प मंदिरात महाआरती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद येथील जागृत असलेल्या साईपुष्प मंदिरात महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री मा.शंकरराव गडाख यांचे वडील माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाआरती व मंत्र पठण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून मा.खा.गडाख हे पुण्यातील एका खासगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असल्याचे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्ट द्वारे कळवले होते. त्यात त्यांनी विज्ञान जेथे थांबते तिथून पुढे आध्यात्म काम करत.

तसेच हॉस्पिटल मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पहावयास मिळत होते. त्यामुळे नेवासा तालुक्यासह जिल्ह्यांतील खा.गडाख यांच्या चाहत्यांमध्ये तसेच कार्यकर्ते चिंताग्रस्त वातावरण दिसत आहे.

सन्मानीय साहेब लवकर बरे होऊन परतावे यासाठी परिसरात विविध ठिकाणी कार्यकर्ते आपले श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात जाऊन देवमाणसासाठी देवाला प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे.

तालुक्याचा व जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासात आणी जडणघडणीत महत्वाची भूमिका असलेल्या लाडक्या नेत्याची प्रकृती सुधारणा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे

असेच खेडले परमानंद येथील साई मंदिरा मध्ये मा.खा.यशवंतराव गडाख यांची प्रकृती सुधारावी यासाठी महाआरती व मंत्राचा घोष करून “सबका मलिक एक” श्री साईबाबानां साकडे घालण्यात आले.

यावेळी मुळा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष नानासाहेब तुवर,युवा नेते अल्लू भाई इनामदार, अजित भाई इनामदार, उपसरपंच प्रशांत तुवर,

साईमंदिराचे पुजारी सुजित मोकाशी हे मान्यवर उपस्थित होते.यांनी सर्वांनी साहेबांना लवकर बरे वाटू दे अशी कळकळीची प्रार्थना केली. सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेवत सुरक्षित अंतर ठेवले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24