महाबळेश्वर,पाचगणी पर्यटनस्थळे खुली : पर्यटकांची होणार कोरोनाची रॅपिड अॅंटीजन टेस्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे टाळेबंदीनंतर शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली होत आहेत.

मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची रॅपिड अॅंटीजन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी दिली.

साताऱ्यातील घटत्या कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधामध्ये शिथिलता आणल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून महाबळेश्वर, पाचगणी ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. निर्बंधांमुळे बाजारपेठा, व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.

येथे येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड अॅंटीजन टेस्ट करण्यात येऊन त्यात बाधित नसलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24