महामंडलेश्वर यांचे कोरोनामुळे निधन ! 72 तासांमध्ये दीड हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-ग्रहांची अद्भुत चाल आणि कोरोनाचे वाढते संक्रमण यामुळे यावर्षी हरिद्वारला कुंभमेळा होत आहे.

या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे.

तर दीड हजार कोरोना पॉझिटीव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे. महामंडलेश्वर कपिल देव यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली.

यानंतर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले आहे.

कुंभ मेळ्यात कोरोनाचे थैमान पहायला मिळत आहे. मागील 72 तासांमध्ये दीड हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. या सर्व कोरोना चाचण्या केसस केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत.

अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24