‘या’ गावातील महाराष्ट्र बँक बंद ! कर्मचारी कोरोना बाधित ; नागरिकांचा खोळंबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-नगर तालुक्यातील जेऊर येथील महाराष्ट्र बँक शाखेचा कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक बंद ठेवण्यात आली आहे.

मार्चअखेर असल्याने नागरिकांच्या कामांचा खोळंबा झालेला आहे. जेऊर येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे.

या बँकेतील कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आल्याने बँक व्यवस्थापनाने बँकेचे संपूर्ण कामकाज बंद ठेवले आहे.

नागरिकांना कर्जप्रकरणे नवी-जुनी करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांची खाते राष्ट्रीयकृत बँक म्हणून महाराष्ट्र बँकेतच आहेत.

खेळते भांडवलाचे कर्जप्रकरणे हि नवे-जुने करण्यासाठी महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी जावेच लागते.

मार्च अखेरीस सर्व कर्ज प्रकरणे भरण्यासाठी तसेच व्याज भरण्यासाठी पैशाची देवाणघेवाण करावी लागते.

बँक बंद असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. बँक बंद असल्याबाबतचा फलक बँकेच्या दरवाजावरच लावण्यात आला आहे.

बँक बंद असल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. बँकेने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24