Maharashtra Breaking : महाराष्ट्द्वेषी सरकारचा आणखी एक निर्णय : टाटा ग्रुपचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळविला ! 30 ऑक्टोबरला मोदीं स्वता करणार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Breaking : काही दिवसापूर्वीच वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प (Vedanta Foxconn company’s semi conductor project) गुजरातमध्ये (Gujarat) गेल्यानं राज्यात राजकारण तापले होते.

हे पण वाचा :-  PAN-Aadhaar Link: नागरिकांनो आजच लिंक करा पॅन-आधार कार्ड नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या सविस्तर माहिती

या प्रकल्पावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधकांनी (opposition) राज्यातील शिंदे सरकारवर (Shinde government) जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे आता पुन्हा राज्यातील एक मोठा प्रकल्प गुजरात मध्ये सुरु होणार आहे. टाटा एअरबसचा प्रकल्प (Tata Airbus project) गुजरातमध्ये सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय हवाई दलाच्या सी-295 (C-295 aircraft) विमान निर्मितीचा हा प्रकल्प गुजरातच्या वडोदरामध्ये उभारला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 30ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं भारतीय हवाई दलातील सूत्रांच्या माहितीनुसार दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी 22 हजार कोटींचा हा प्रकल्प नागपूरला सुरु होणार असल्याचे सांगितले होते.  या आधी हजारो कोटींचा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, जो महाराष्ट्रातील दोन लाख युवकांना रोजगार देणार होता, तो प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता 22 हजार कोटींचा हा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट गुजरातला जाणार आहे.

काय आहे हा C-295 प्रकल्प?

‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत विमान निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (IAF) वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम शिंदे आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हे पण वाचा :- iPhone Price Hike : अर्रर्र ग्राहकांना धक्का ! आयफोन महाग ; आता खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

भारतातील टाटा समूह आणि यूरोपियन कंपनी एअरबस यांच्यावतीनं संयुक्तपणे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एअरबस ही यूरोपमधील महत्त्वाची विमान निर्मिती करणारी कंपनी आहे. भारतात सी-295 विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी ही पहिली परदेशी कंपनी ठरली आहे. टाटा एअरबस यांच्याकडून वडोदरामधील प्रकल्पात 40 विमानांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय एअरफोर्ससाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती आणि निर्यातीच्या उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती एएनआयनं संरक्षण सचिवांच्या हवाल्यानं दिली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतानं एअरबस सोबत 56 सी-295विमानांच्या निर्मितीसाठी 21 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या एवीआरओ-748 या विमानांची जागा सी-295 विमानं घेणार आहेत. भारतीय हवाई दलासाठी पहिल्यांदा खासगी कंपनी विमानांची निर्मिती करणार आहे. भारत सरकार आणि एअरबस यांच्यातील करारानुसार पहिली 16 विमानं पुढील चार वर्षात स्पेनमध्ये निर्मिती असलेली भारतीय हवाई दलाला दिली जाणार आहेत.

40 विमानांची निर्मिती टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स यांच्या संयुक्त प्रकल्पात केली जाणार आहे. सी-295 च्या द एअरबस डिफेन्स अँड स्पेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमला भारतीय नियामक संस्था डीजीएक्यूएनं परवानगी दिली आहे.

सी-295 विमानाची वैशिष्ट्ये

सी-295 विमान हे हवाई दलासाठी महत्त्वाचं समजलं जातं. मोठ्या संख्येनं सैनिकांची वाहतूक करण्यासाठी सी-295 महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. एअरबस भारतात टाटा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारत डायनामिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशी करार करणार आहे.

हे पण वाचा :-  Hero Splendor Plus : स्वप्न होणार पूर्ण ! फक्त 5 हजारात घरी आणा हिरो स्प्लेंडर प्लस; जाणून घ्या कसं