महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे सक्कर चौक ते कोठी नालेसफाई व रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  सक्कर चौक ते कोठी रस्त्याच्या बाजूला असलेली गटार हि मातीच्या भरावा मुळे तुंबल्या मुळे सक्कर चौक येथील रहिवाशी त्रस्त झाले होते त्यांच्या घरात पावसाचे व ड्रेनेज चे तुंबलेले पाणी घरात घुसू लागल्यामुळे नाहक त्रास होत असल्यामुळे त्यांनी हि बाब मनसेच्या नितीन भुतारे यांना सांगितली

तसेच उड्डाणपूल व भूयारी गटार योजनेच्या कामामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे अहमदनगर पुणे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे हि बाब सुध्दा महानगरपालिकेच्या निदर्शनास नितीन भुतारेआणून दिल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून

मनसेला प्रयत्ना मुळे येथील नागरीक या सर्व समास्यां मनसे मुळे मार्गी लागल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत. तुंबलेल्या गटारीचे नालेसफाई चे काम व पुणे महामार्गावरील उड्डाण पुलामुळे व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्यावर पाहणी करण्यासाठी

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे , सुनिल खांडेकर, अभी खांडेकर, तसेच महानगरपालिकेचे अधिकारि भालेराव, उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या कंपनी चे अधिकारि व कर्मचारी तसेच स्थानिक नागरीक उपस्थीत होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24