अहमदनगर सह राज्यात पुढील चार ते पाच तासात जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ह
वामान खात्याने आज विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट दिला आहे.
हवामान खात्याचे हवामानतज्ज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट करुन आगामी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे,
कोकण आणि घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत. दरम्यान वेगवान वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यात पुणे, नाशिक, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा,पालघर, ठाणे येथे ढगांची दाटी दिसत असून ह्या ३ ,४ तासात विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.