ताज्या बातम्या

Maharashtra Schools : कोरोना वाढतोय, शाळांचं काय होणार? शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Schools : एककीडे मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असताना शाळा सुरू होण्याचा दिवसही जवळ आला आहे.

पूर्वीच्या लाटांमध्ये सर्वाधिक गोंधळ शिक्षणाचा उडाला होता. १३ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता शाळांसंबंधी काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

यासंबंधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, ठरल्याप्रमाणं १३ जूनपासून शाळा सुरू होतील. मात्र, यासाठी नवी नियमावली तयार केली जाईल. त्याची अंमलबजावणी करून शाळा सुरू कराव्या लागणार आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय लगेच घेतला जाणार नाही. त्यामुळं ठरल्याप्रमाणे शाळा सुरु होतील, मात्र त्यासाठी नवी नियमावली असणार आहे, असं ही गायकवाड यांनी सांगितलं.

Ahmednagarlive24 Office