महाराष्ट्र पुन्हा हादरला ! शिर्डीहून कल्याणला आलेल्या मुलीसोबत झाले असे काही…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  मुंबईतील साकीनाका येथे शुक्रवारी झालेल्या बलात्कारामुळे शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले. आता आणखी उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ आणखी अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीला एका पडक्या खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात हातोडा मारला. त्यानंतर तिला जबरदस्तीने जवळच्या पडक्या घरात नेले. तिथे तिला डांबून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिच्या मित्रांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे शिर्डीहून कल्याणला आलेली ही मुलगी उल्हासनगर स्थानकाजवळच्या स्कायवॉकवर उभी होती.

त्याठिकाणी तिचे दोन मित्रही होते. तेव्हा एकजण तिच्याजवळ आला. त्याच्या हातात असलेला हतोडा दाखवून त्यानं तिच्या मित्रांना पळवून लावलं. त्यानंतर बळजबरीनं या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकारानंतर पहाटेपर्यंत मुलगी त्याठिकाणीच पडलेली होती. आरोपी बलात्कारानंतर पळून गेला.

त्यानंतर तरुणीनं मित्रांना फोन केला आणि घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं तपास करत आरोपी गायकवाड याला अटक केली आहे. त्यानं गुन्हा मान्य केला असून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी या घटनेचा तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी पॉस्कोखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली. गायकवाडने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Ahmednagarlive24 Office