ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : विजय कोणाचा ? जाणून घ्या सविस्तर निकाल इथे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Maharashtra Vidhan Parishad Election Result 2022 : लाईव्ह अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा

महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का, प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची पहिल्या पसंतीची २१ मते फुटली

भाजपचे पाचही उमेदवार विजयी, काँग्रेसच्या भाई जगताप यांचा दारूण पराभव

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे यांचा विजय 

संख्याबळ नसतानाही भाजपचे प्रसाद लाड विजयी !

शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी,

भाजपाकडून प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे,

राष्ट्रवादी काँग्रेस – राम राजे निंबाळकर व एकनाथ खडसे विजयी

कोण किती मतांनी विजयी झालं?

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
भाजप

1) प्रवीण दरेकर -26
2) राम शिंदे -26
3) श्रीकांत भारतीय – 26
4) उमा खापरे -26
5) प्रसाद लाड – 26

शिवसेना

1) सचिन अहिर-26
2) आमशा पाडवी- 26

राष्ट्रवादी

1) रामराजे नाईक निंबाळकर- 26
2) एकनाथ खडसे- 27

………………………………………………………

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद ठरवण्यात आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता उमेदवाराला २५.७१ चा नवा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

तब्बल दोन तासांच्या विलंबाने विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद करण्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींमध्ये खडाजंगी सुरु आहे

विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

विधान परिषद निकाल आधीच एकनाथ खडसे यांचा दणदणीत विजय असे खडसे समर्थकांकडून बॅनर

काँग्रेसला झटका, मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावरील आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला,

राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळला आहे. तसं पत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मेलद्वारे पाठवलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं हे पाहावं लागणार आहे.

महाविकास आघाडीने आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसनं घेतलेला आक्षेप असंवेदनशिलतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यसभेला या दोन्ही आमदारांनी स्वत: मतदान केलं होतं. आता त्यांनी सही स्वत: केली आणि मतपत्रिका दुसऱ्याच्या हातून मतपेटीत टाकली. दहा दिवसांत असा काय फरक पडला? – काँग्रेस नेते सतेज पाटील

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24