ताज्या बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला; उपमुख्यमंत्र्यांनी डागले टीकास्त्र

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

देशाला कर रुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली आहे, अशी टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्राने केंद्र सरकारला देशभरातील राज्यांनी विद्यमान आर्थिक वर्षात जीएसटीच्या माध्यमातून एकूण 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करुन दिला.

त्यापैकी एकट्या महाराष्ट्राने तब्बल 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल केला. मात्र त्याच्या बदल्यात महाराष्ट्रात विशेष काही परतावा मिळाला नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला अवघे 4500 कोटी रुपये आले.

त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने हा अर्थसंकल्प जाहीर केला की काय, अशी शक्यता वाढते. महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय आले असेज

कोणी विचाले तर काहीच नाही, असेच उत्तर मिळते, असेही अजित पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये जीएसटीची वसूली सर्वोच्च झाली असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तू आणि सेवाकराची वसूली वाढल्यामुळे राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढविणे आवश्यक आहे.

वस्तू आणि सेवाकराच्या वसुलीतील नुकसान भरपाई राज्यांना मिळण्यास, पुढील ५ वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती राज्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office