Maharashtra Weather : सध्या मान्सून (Monsoon) सर्वदूर पसरताना दिसत आहे. तसेच त्याचा जोरही वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) हवामान खात्याकडून (Weather Department) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई (mumbai) आणि अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले आहे.
दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या ५ दिवसांत यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदवला जात आहे. बुधवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
मुंबई हवामान
बुधवारी मुंबईत कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 21 वर नोंदवला गेला.
पुणे हवामान
पुण्यात कमाल तापमान 29 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि सामान्य पाऊस अपेक्षित आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 53 नोंदवला गेला आहे.
औरंगाबाद हवामान
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथील हवामानही नाशिकसारखेच असणार आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 93 आहे.
नागपूर हवामान
नागपुरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि एक किंवा दोनदा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 53 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक हवामान
नाशिकमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 49 आहे.