Maharashtra Weather : थोड्या दिवसातच मान्सून चे (Monsoon) आगमन होणार आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
कारण महाराष्ट्रात सध्यातरी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आणि हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही ठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
शनिवारी महाराष्ट्रातील हवामान (Weather) संमिश्र राहील. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर अनेक भागात अंशत: ढगाळ आकाश असल्याने तापमानात घट झाली आहे.
यासोबतच कडक उन्हापासूनही दिलासा मिळाला आहे. शनिवारीही मुंबईसह अनेक ठिकाणी हलके ढगाळ आकाश असेल तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, भारतीय हवामान खात्याने (IMD) 21 मे रोजी विदर्भात ‘लू’ सुरू होण्याची शक्यता व्यक्त करत इशारा दिला होता. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये शनिवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
मुंबई
शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी हवामान स्वच्छ होईल. दुपारनंतर आकाशात हलके ढगाळ वातावरण राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 141 वर नोंदवला गेला.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अंशतः ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 167 नोंदवला गेला.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पाऊस किंवा गडगडाट किंवा धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 29 आहे, जो ‘चांगल्या’ श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. ‘मध्यम’ श्रेणीतील हवेचा दर्जा निर्देशांक 102 आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथील हवामानही नाशिकप्रमाणेच राहणार आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 88 आहे.