अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राज्यात ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजना सुरु झाल्या असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.
या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रोनची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.
सुदैवाने या कोरोनाबाधित व्यक्तीच्या भावाचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. तर कुटुंबातील उर्वरित सदस्यांची चाचणी ही सोमवारी 29 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे,
अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे.