महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षे टिकेल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- आदिवासी संशोधन केंद्र हे पुण्यासारख्या शहरात करण्याऐवजी ते आदिवासीबहुल क्षेत्रातच व्हायला हवे. त्यासाठी आपण मोर्चेबांधणी करणार आहोत. टिसचा सर्वेक्षण रिपोर्ट अद्याप सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही.

मात्र तो प्राप्त झाल्यानंतर आदिवासी संशोधन केंद्र हे विकासात्मक प्रक्रियेत करण्याबाबत आपण सकारात्मक धोरण स्वीकारू. आमच्यासोबत दोन पक्ष सरकारमधे सत्तेवर असून राज्यातील तीन पक्षांच्या भावकीत अंतर येणार नाही.

हे महाविकास आघाडीचे सरकार पुर्ण पाच वर्षे टिकेल, असा विश्वास विधानसभेचे उपाध्यक्ष व हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष व उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ शनिवारी अकोल्यात आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदिवासी संशोधन केंद्र हे पुण्यात करणे प्रशस्त वाटतंय काय? यावर भाष्य करताना आपले मत व्यक्त केले.

धनगर आरक्षणाबाबत ते म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण दिले पाहीजे, पण ते देताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.

अकोले तालुका पत्रकार संघाचे व रोटरी क्लब ऑफ अकोलेचे माजी अध्यक्ष अमोल वैद्य यांच्या निवासस्थानी झिरवळ खाजगी कामासाठी शनिवारी दुपारनंतर अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24