अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्यातील आघाडी सरकारमध्ये ओबीसी नेते मंडळी असली तरी राजकीय आरक्षण रद्दच्या मुद्द्यावर ते राजीनामा देऊ शकत नाहीत. कारण महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारातून त्यांचे घर सुरू असल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला.
ओबीसी आरक्षण रद्दच्या निषेधार्थ नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरीच्या जिजाऊ चौकात शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात ते बोलत होते.
राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ उपस्थितांनी घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडीच्या दुर्लक्षित पणाने गेले.
दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या आघाडी सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र, आश्वासनाची पूर्तता करण्याऐवजी जनतेच्या तोंडाला पाने पुसली.
खासदार डाॅ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते तहसीलदार फसियोद्दिन शेख व पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, मुळा प्रवरा संचालक रावसाहेब यादवराव तनपुरे, डाॅ. तनपुरे साखर कारखाना अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, संचालक सुरशिंग पवार, संचालक रवींद्र म्हसे, सं चालक शिवाजी गाडे,
राहुरी बाजार समितीचे संचालक सुरेश बानकर, महेंद्र तांबे, नगरसेवक शहाजी जाधव, वांबोरीचे माजी उपसरपंच राजेंद्र पटारे, अमोल भनगडे, माजी सरपंच अंकुश बर्डे, सरपंच अनिल आढाव, युवराज गाढे, प्रभाकर हरिश्चंद्रे, कुलदीप पवार,
अण्णासाहेब शेटे, राजेंद्र उंडे, उमेश शेळके, सुजय काळे, शरद म्हसे, निसार शेख, सुभाष गायकवाड, सुकुमार पवार, उदय मुथ्था,
प्रमोद गांधले, गणेश खैरे, अफनान आतार, राजेंद्र गोपाळे, विक्रम गाढे, बापूसाहेब ढसाळसह कार्यकर्ते सामील झाले होते.