Mahindra Scorpio : नुकतीच महिंद्राची (Mahindra) ‘स्कॉर्पिओ एन’ (Scorpio N) बाजारात (Market) दाखल झाली आहे. सर्वच जण या कारची (Car) आतुरतेने वाट पाहत होते. ही कार बाजारात दाखल होण्यापूर्वीच या कारचे फीचर्स (Features) आणि किंमत (Price) समजली होती.
महिंद्राने रिलीज केलेल्या टीजरमधून या कारला ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ असे म्हटले होते. परंतु अनेकांना एक प्रश्न सर्वांना सतावत आहे तो म्हणजे नव्या एसयूव्हीच्या नावात ‘एन’ का ठेवण्यात आले आहे. याबाबत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर लोकांना प्रश्न विचारले आणि त्यांना अनेक मजेदार उत्तरे दिली.
आनंद महिंद्रा यांनी एनचा अर्थ विचारला होता
यासोबतच त्याने एका यूजरचे उत्तरही शेअर केले. चंदना नावाच्या युजरने आपल्या रिप्लायमध्ये लिहिले आहे. या कारमध्ये स्कॉर्पिओचा डीएनए कायम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर डिझाईन, इंटिरियर आणि तंत्रज्ञान अमर्याद पातळीवर नेऊन ही नवीन पिढीची अस्सल SUV बनवण्यात आली आहे.
महिंद्रा यांना युजरचे हे उत्तर आवडले आहे.याबाबत त्यांनी युजरच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. एन प्रत्यय जोडण्याचा आमचा दृष्टीकोन समजला आहे, परंतु तरीही त्यात सर्व काही समाविष्ट झालेले नाही.
आनंद महिंद्रा यांनी एनचा खरा अर्थ सांगितला
शेवटी, आनंद महिंद्रा नवीन स्कॉर्पिओच्या N चा खरा सांगितला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘स्कॉर्पिओ क्लासिक कायम ठेवण्यात आला आहे, त्यामुळे आम्हाला या नवीन अवताराला एक प्रकारे वेगळी ओळख द्यायची होती. म्हणून ‘N’ प्रत्यय जोडला गेला, जो अमर्याद क्षमतेसह मूळ DNA चे प्रतिनिधित्व करतो. आणि काही लोकांना स्कॉर्पिओन सुद्धा म्हणायचे असेल तर आमची हरकत नाही’.