Mahindra XUV400 EV : भन्नाट ! आधीच ऍडव्हान्स असणाऱ्या या XUV मध्ये वाढवलेत ‘हे’ जबरदस्त फीचर्स, पाहून वेडे व्हाल

Published by
Ahmednagarlive24 Office

Mahindra XUV400 EV : महिंद्राच्या कार जबरदस्त लोकप्रिय आहेत. त्याची क्रेझ काही वेगळीच आहे. या गाड्यांचा लूक, सेफ्टी, इतर फीचर्स या काही औरच असतात. एकदम रिच लूक देणाऱ्या महिंद्रा जबरदस्त डिमाण्डेड आहेत.

आता महिंद्राच्या चाहत्यांसाठी व ज्यांना महिंद्राची कार विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. महिंद्राची स्टायलिश इलेक्ट्रिक कार XUV400 ही आता आणखी जबरदस्त सेफ्टी फीचर्स व इतर फिर्चर्सने अपडेट केली गेली आहे. हे अपडेटेड कार येत्या वर्षात अर्थात 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या XUV400 EV चे टॉप मॉडेल 19.5 लाख रुपये किमतीचे असेल. परंतु यातील फीचर्स व अपडेट्स झालेले सेफ्टी फीचर्स जर तुम्ही पाहाल तर तुम्ही अगदी वेडे होऊन जाल.

 ‘या’ नवीन गोष्टी झाल्यात ऍड :- महिंद्रा XUV400 EV मध्ये सध्या 7.0 इंचाची टचस्क्रीन होती तर ती आता या अपडेटेड मध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट असेल. यात ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचे फिचर असेल. यामध्ये एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम असेल. ही सिस्टीम अशी आहे जर कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू तुमच्या गाडीजवळ आल्यावर ऑडिओ अलर्ट मिलतो.

म्हणजेच अपघाताची शक्यता पूर्णतः कमी होते. या सोबतच 360-डिग्री कॅमेरा देखील यामध्ये असणार आहे. Mahindra XUV400 EV ही कार 5 मोनोटोन आणि 5 ड्युअल टोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. ही फाईव्ह सीटर असून यातील बूट स्पेस 378 लीटर आहे.

आता तुम्ही म्हणाल चार्जिंगच काय?तर फास्ट चार्जरने जर आपण ती चार्ज केली तर ही कार 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. 7.2 kW AC चार्जरसह चाह्र्ज केल्यास 6.5 तासांत आणि 3.3 kW सामान्य घरगुती चार्जरने चार्ज केल्यास ती 13 तासांत चार्ज होईल.

एकदाच करा चार्ज, 456 km जाईल:-  सध्या बाजारात जी कार अव्हेलेबल आहे त्यात EC ट्रिममध्ये 34.5 kWh चा बॅटरी सेटअप आहे. ही बॅटरी चार्ज झाली की साधारण 375 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. कारची EL ट्रिम 39.4 kWh च्या बॅटरी पॅकसह यते. इची क्षमता अत्यंत उच्च आहे असे म्हणायला हरकत नाही.

कारण ती एकदा चार्ज केली की एका चार्जवर 456 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची चार्जिंग क्षमता 7.2 kW आहे. Mahindra XUV400 मध्ये 150 hp इलेक्ट्रिक मोटर आहे. ही अनेकांची आवडती EV आहे. बाजारात आता नव्या अपडेटेड फीचर्स मध्ये आल्यानंतर खूप मोठे मार्केट ती कॅप्चर करेल अशी कंपनीला अपेक्षा आहे.

Ahmednagarlive24 Office