Amazon Smart TV Sale : उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. वर्षाच्या वर्षाच्या अखेरच्या सेलमध्ये तुम्ही निम्म्या किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे.
तसेच 3,000 रुपयांपेक्षा जास्त एक्सचेंज बोनस आणि 2,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्ट टीव्ही करण्याची संधी गमावू नका.
1. Coocaa 32 इंच
हा याच वर्षी लॉन्च केलेला सर्वात स्वस्त 32-इंचाचा टीव्ही स्मार्ट असून ज्याची किंमत 27,999 रुपये आहे. मात्र ऑफरमुळे या टीव्हीवर 61 टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे हा टीव्ही तुम्ही 10,499 रुपयांना आणू शकता.
या टीव्हीमध्ये एचडी डिस्प्ले, कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI, 2 USB पोर्ट दिले आहेत. तर टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20W साउंड आउटपुट, व्हॉईस असिस्टंट फीचर आणि स्क्रीन मिररिंग आहे.
2. LG 43 इंच
यावर्षी एलजीचे अनेक स्मार्ट टीव्ही लाँच झाले आहेत. या सिरीजमध्ये 43 इंच, 55 आणि 65 इंची टीव्ही लाँच केले होते. 43-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 49,990 रुपये इतकी असून ऑफरमुळे या टीव्हीवर 38 टक्के सूट मिळत आहे, त्यामुळे हा टीव्ही तुम्ही 30,990 रुपयांना आणू शकता. टीव्हीचा डिस्प्ले 4K अल्ट्रा एचडी दर्जाचा आहे.
तर हा AI ThinQ स्मार्ट टीव्ही असून यामध्ये 4K स्केल आहे ज्यामुळे 4K नसलेला कंटेंटही 4K व्हिडिओ गुणवत्तेत पाहता येईल. टीव्हीमध्ये AI ब्राइटनेस कंट्रोल आहे जे चित्रानुसार ब्राइटनेस अनुकूल करते. या टीव्हीमध्ये AI साउंड आणि 20W साउंड आउटपुट आहे. त्याचबरोबर या टीव्हीमध्ये अलेक्सा बिल्ट इन आहे
3. सोनी ब्राव्हिया 55 इंच
सोनीचा हा सगळ्यात महागडा 55-इंचाचा टीव्ही आहे. याची किंमत 2,49,900 इतकी असून ऑफरमुळे हा टीव्ही 1,29,990 रुपयांना खरेदी करू शकता. ज्याचा डिस्प्ले 4K अल्ट्रा HD आणि रिफ्रेश दर देखील इतर टीव्हीपेक्षा 120 Hz अधिक आहे. डिस्प्लेचे चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी XR कॉग्निटिव्ह प्रोसेसर कंपनीने दिला आहे.
4. सॅमसंग 65 इंच
सॅमसंगने या सीरीजमध्ये 43, 50, 55 आणि 65 इंचाचे टीव्ही लॉंच केले आहेत. यापैकी 65-इंचाच्या टीव्हीची किंमत 1,16,900 रुपये असून ऑफरमुळे 32 टक्के सूट मिळत आहे. त्यामुळे तो तुम्ही 78,990 रुपयांना खरेदी करू शकता.
या टीव्हीमध्ये 4K UHD रिझोल्यूशन आणि रिफ्रेश दर 60 Hz आहे. तसेच यामध्ये शक्तिशाली स्पीकर्ससह डॉल्बी डिजिटल प्लस आणि क्यू सिम्फनीसह 20W साउंड आउटपुट, व्हॉईस असिस्टंटची सुविधा आणि स्क्रीन मिररिंगही करता येते.