अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-आता प्रत्येकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवून पैसे कमवत आहे.
यूट्यूब, शॉर्ट व्हिडीओ अॅप्स आणि इतर प्लॅटफॉर्म या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, परंतु एका नव्या घोषणेत फेसबुकने म्हटले आहे की आता वापरकर्ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, कंटेंट क्रिएटर्स आता त्यांचे व्हिडिओ मोनेटाइज करू शकतात, तर प्लॅटफॉर्म आता या निर्मात्यांच्या व्हिडिओंवर जाहिरात देखील देईल.
एका ब्लॉग पोस्टमध्ये, फेसबुकने म्हटले आहे की, आम्हाला असे वाटते की, कंटेंट क्रिएटर्स यांनी कमाई करावी. फेसबुकवर, digipubs, , व्हिडिओ क्रिएटर्स, गेमिंग क्रिएटर्स, मीडिया कंपन्या,
कल्चरल इंस्टीट्यूशन आणि अन्य जनेस कंटेंट क्रिएट केले जाते. कंपनीने असे म्हटले आहे की, आम्हाला या कंटेंट क्रिएटर्ससाठी असे टूल्स प्रदान करायची आहेत जेणेकरुन ते पैसे कमवू शकतील.
एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुकने म्हटले आहे की साथीच्या रोगामुळे या कंटेंट क्रिएटर्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आमच्या प्लेटफॉर्म च्या मदतीने आम्ही त्यांना सपोर्ट करू इच्छितो.
कंटेंट क्रिएटर्स अशा प्रकारे कमावू शकतात :- व्हिडिओ क्रिएटर्स आता त्यांच्या छोट्या किंवा एक मिनिटाच्या व्हिडिओंमधून पैसे कमवू शकतात. त्याच वेळी, क्रिएटर्सच्या व्हिडिओवर 30 सेकंदांची जाहिरात प्ले केली जाईल. 3 किंवा अधिक मिनिटांच्या व्हिडिओंवर, ही जाहिरात 45 सेकंदांपेक्षा जास्त चालली पाहिजे.