अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- आयुष्य हे नेहमीच अनिश्चित असते. कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. अशातच आपल्यावर मोठी जबाबदारी असते की आपले भविष्य सुरक्षित बनावे.
खासकरून तुमची मुले तुमच्यावर अवलंबून असतात. मुलांचे शिक्षण, लग्न आणि अन्य खर्चासाठी आधीच तरतूद करावी लागते. अशातच यावेळेस जीवन विमा निगम यात मोठी भूमिका बजावतात.
देशातील सर्वात मोठी सरकारी लाईफ इश्युरन्स कंपनी भारतीय जीवन विमा निगम(LIC) अनेक दशकांपासून ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना प्लान देत आहेत.
मुलांशी संबंधित गरजा पाहता एलआयसीचा नवा न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लान एक चांगला प्लान आहे. ही स्कीम मुलांशी संबंधित गरजा पाहता तयार करण्यात आली आहे. जाणून घ्या या स्कीमबाबत
स्कीमशी संबंधित अटी
- – एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसी घेण्याचे किमान वय 0 वर्षे आणि कमाल वय 12 वर्षे आहे.
- – पॉलिसीची किमान मर्यादा 10 हजार रुपये आहे , अधिकतम मर्यादा नाही.
- – एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक पॉलिसीमध्ये प्रीमियम वेव्हर बेनिफिट राइडर-ऑप्शन देखील आहे.
- – एलआयसीच्या न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक योजनेची एकूण मुदत 25 वर्षे आहे.
- – एलआयसी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅननुसार, एलआयसी मुलाच्या 18 वर्ष, 20 वर्षे आणि 22 वर्ष पूर्ण झाल्यावर मूलभूत रकमेपैकी 20-20 % रक्कम दिली जाते. पॉलिसीधारकाने 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर उर्वरित 40% रक्कम दिली जाईल. तसेच, सर्व थकित बोनस दिले जातील. पॉलिसी मुदतीआधीच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असल्यास, सम अॅश्युअर्ड व्यतिरिक्त मूलभूत साधा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल. डेथ बेनिफिट एकूण प्रीमियम पेमेंटच्या 105% पेक्षा कमी नसेल.
एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-
- तुमच्या आधारकार्ड / पॅनकार्ड व अॅड्रेस प्रूफसाठी राशन कार्ड लाईट बिल.
- विमाधारकाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे आधी आणि आत्तापर्यंत आहेत.
- विमाधारकाने अर्ज भरला पाहिजे, त्याचे पालकदेखील प्रस्ताव फॉर्म भरू शकतात.
- जर मुलाचे वय कमी असेल तर किंवा पॉलिसीची रक्कम जास्त असेल तर त्यासाठी वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाईल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
-